पाकिस्तान पेक्षाही  भाजपाला  शेतकरी हा मोठा शत्रू ; बाळासाहेब थोरात

 शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठीच शेतीमाल परदेशातून आयात केला जात आहे. पाकिस्तानपेक्षही भाजपाला शेतकरी मोठा शत्रू वाटतो आहे. अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्या विरोधात  पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अजुन राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा झळ बसलेली  नाही. मात्र धोका कायम आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या एका आंदोलना दरम्यान  ते बोलत होते.सध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे.
कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. म्हणजेच आज देशातील भाजपा सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा त्यांचा मोठा शत्रू वाटतो आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेतं. दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. अशात कृषी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेसने  या कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प ने मत मिळवण्यासाठी काळा गोरा भेद करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  पण भेदभावाचं राजकारण करता येणार नाही हे सांगणारा निर्णय अमेरिकेत होतो आहे असा निर्णय भारतातही झाल्याशिवाय राहणार नाही असंही थोरात यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार मूठभर लोकांसाठी काम करतं आहे. केंद्र सरकारने धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा आणि आपली पोळी भाजायची, जनतेवरअन्याय  करायचा, जनता काही बोलत नाही. मात्र आता हे धोरण चालणार नाही असंही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here