लपून-छपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या ;आदित्य ठाकरेना जाहीर आव्हान

मेट्रो शेडची साठी आरेची जागा रद्द करत ती कांजूरमार्गे हलवण्यात आली हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कांजूरमार्ग ची जमीन केंद्र सरकारची असल्याचा दावा  केंद्राने केला. या विषयावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे वाद चालू  आहेत. यातच भाजपा नेते आशिष शेलार यांनी “आपण लपून-छपून मुलाखती देण्यापेक्षा या विषयावर थेट चर्चेला या आम्ही कुठलीही व्यासपीठावर बोलण्यास तयार आहोत” असे आवाहन आदित्य ठाकरेंना केले आहे.” 

मेट्रो कार शेड च्या प्रस्तावामुळे सॉल्ट  पॅन बाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटींचा जागाच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी काँग्रेससोबत करताय की काय” असा सवाल देखील आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. तसेच आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

आघाडी सरकारने मेट्रोची जागा हलवून कांजूरमार्ग केली आणि ही जागा महाराष्ट्र सरकारचीच आहे अशी भावनिकता निर्माण करून  जनतेची दिशाभूल केल्याचे त्यांनी म्हटले तसेच केंद्र सरकारकडून 1983 साली काँग्रेसच्या सरकारच्या काळी महाराष्ट्रातील मुंबई मधून कांजूर मार्गाची ही जागा  महाराष्ट्राची नाही असा दावा त्यावेळी केंद्रातील काँग्रेसच्या सरकारने केला होता.  मात्र याला विरोध करत 2014 साली तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा महाराष्ट्राच्या नावावर करण्यात यावी हा दावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here