अर्णव गोस्वामीला उच्च न्यायालयात दिलासा नाहीच, उद्या पुन्हा सुनावणी

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी 
मुंबई : पत्रकार अर्णव गोस्वामी यांना उच्च न्यायालयात आजही दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे. अर्णव गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून याचिका दाखल केली होती.
त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.तर, अलिबाग पोलिसांनीही अलिबाग सत्र न्यायालयात याचिका दाखल करून अर्णब ला  पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही उद्या सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे. अर्णबच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याने त्याला  पुन्हा एकदा अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत रहावे लागणार आहे.
अर्णव गोस्वामी याच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना थेट जेलमध्ये न नेता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यामुळे या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी ला  अटक करण्यात आली. यानंतर अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here