गळनिंब येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामानाची तोडफोड

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

श्रीरामपूर : तालुक्यातील गळनिंब येथील जि.प.शाळेत अज्ञात चोरट्यांनी तिसर्‍यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला असून, चोरट्यानी काल रात्री, रेकाॅर्ड रूमाच्या व कॉम्प्यूटर लॅबच्या खिडक्याचे कडी -कोयंडा उचकटून आत प्रवेश केला तेथिल रेकॉर्ड रुमामधील सामानाची उचकापाचक करून तोडाफोड केली, असता कॉम्प्युटरच्या वायरिंग तोडून फेकून दिल्या, शाळेतील बर्‍याच इलेक्ट्रॉनिक वस्तूचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. तिसर्‍यादा असा प्रकार गळनिंब येथील जि प शाळेत घडला. तसेच हा प्रकार खोडसाळपणा की, चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात इसमाने जि प शाळेत प्रवेश केला असावा अंदाज व्यक्त केला जात असून, अनेक चर्चेना उधाण आले आहे.
       तिन्ही वेळेला असा प्रकार घडल्याने गळनिंब येथील पालक वर्गातून संतप्त झाले आहे.    

घडलेला प्रकार शुक्रवारी सकाळी जि प शाळेच्या मुख्याध्यापिकाना शाळेत गेल्यावर लक्षात आला होता त्यांनी तातडीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य मंडळाच्या लक्ष्यात आणून दिला असता, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्यांनी  याप्रकरणी, कोल्हार पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here