अवैध व्यवसायाबाबतची माहिती पोलिसांना कळवा आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी

  राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

श्रीरामपूर : आपल्या गावातील अवैध व्यवसाय व त्यातून फोफावणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता सजग नागरिकांनीही पुढे येणे गरजेचे असून आपल्या गावात जर कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी  असेल अथवा अवैध व्यवसाय सुरू असतील तर तशी माहिती पोलिसांना कळवावी कोणत्याही दबावाला भीक न घालता पोलीस त्याचा बंदोबस्त करतील असे प्रतिपादन आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी केले आहे. ते शुक्रवारी बेलापूर पोलीस ठाण्यात ग्रामस्थांच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी बोलताना नोपाणी म्हणाले, येथुन पुढे जर कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आले तर त्याची रीतसर नोंद केली जाईल. यापूर्वी राजकीय पदाधिकारी पोलिसांवर दबाव आणून किंवा सामंजस्य दाखवीत वाद मिटवीत होते.

वाद मिटलेच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही मात्र जर कोणतीही लेखी समज न देता जर चूक करणाऱ्यांना सोडले तर त्यांची मानसिकता बळावते. अन त्याचे रूपांतर भविष्यात मोठया गुन्ह्यात होते. कोणत्याही मोठया गुन्ह्याचे मूळ छोट्या गुन्ह्यात असते हे विसरून चालणार नाही.या प्रसंगी भरत साळुंके, सुनील मुथा,देविदास देसाई, ज्ञानेश्वर गवले,सुधीर नवले आदींनी विविध समस्या मांडल्या. दरम्यान नोपाणी यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक सार्वजनिक केला असून काहीही अडचणी असतील तर जनतेने संपर्क साधावा असेही आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here