लग्न मोडल्याने तरुणीने केली आत्महत्या

 पिंपरणे : संगमनेर तालुक्यातील होणाऱ्या पतीने मुलगी अपशकुनी असल्याने हिनवून लग्न मोडल्याने, हा धक्का सहन न झाल्याने शेजारील पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. तर साखरपुडा दिलेले दागिने चांगल्या डिझाईनचे बनवतो म्हणून फसवणुक केल्याने आश्वी पोलिस स्टेशनमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल झाला, अद्याप चारही आरोपी फरार असल्याचे समजले आहे.                       
 आश्वी पोलिस ठाण्यात किरण सांगळे यांच्या दिलेल्या फिर्यादी’वरुन’ गुरुवार (दि.५) नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ७ वाजेच्या पूर्वीच हंगेवाडी शिवारात पांडुरंग लक्ष्मण सांगळे यांच्या शेतातील विहीरीमध्ये भारती भास्कर सांगळे ही मुलगी  मृतावस्थेत आढळूून आली, मयत भारती भास्कर सांगळे हिचा, मुंबई येथील सागर अर्जुन सानप यांच्या बरोबर विवाह ठरला होता. यांचा (दि ३०), जून २०२० रोजी साखरपुडा झालेला होता. मुलीच्या घरच्यांनी मुलांकडील घरच्यांना एक तोळा सोन्याचे अंगठी व दोन लाख रुपये विश्वासाने दिले होते. तसेच आरोपी असणारे यांनी मयत भारती हिस दोन तोळे सोन्याचे नेकलेस व कानातील दागिने दिले होते.

मात्र साखरपुड्या नंतर सागर सानप यांने मुुलीच्या घरच्यांशी चांगले संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन करून सागर यांने मयत भारती हीच साखरपुड्यात दिलेले दागिने व्यवस्थित करून आणतो, असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर (दि.11) नोव्हेंबर २०२० रोजी सागरने भारतीला फोन वरून तुझ्या घरचे आमच्यासाठी अपशकून असल्याचा आरोप करत ठरलेला विवाह मोडल्याच सांगितले. यामुळे भारतीने विहिरीत उडी घेऊन जीव दिला.
      साखरपुडातील दागिने व रोख रक्कम दिल्याचे न कबूल झाल्याचे दिवसाढवळ्या त्यांचा अपहार केला. तसेच यांनी  भारती आणि तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून पुन्हा आमच्याशी संपर्क करू नका असे म्हणून मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले. अशी तक्रार भारतीच्या घरच्यांनी दाखल केली आहे.                                                                   
          आश्वी पोलीस ठाण्यात सागर अर्जुन सानप, अर्जुन केशव सानप, सुजाता अर्जुन सानप, स्नेहा तुषार आव्हाड, या ४ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, सोन्याच्या दागिने व पैसाची हेराफेरी करुन अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधीक तपास पो. नि. सुधाकर मांडवकर यांच्या नेतृत्वाखालील आश्वी पोलीस करत आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here