घरफोडी चोरी दोघेजण अटकेत; लोणीकंद गुन्हे शोध पथकाची कारवाई

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी


वाघोली: लोणीकंद पोलीस ठाण्यात नितेश श्रीराम पवार वय 25 वर्षे, रा. चौधरी पार्क कॉलनी नं 8, दिघी, पुणे हे स्वतः बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी शुभंकर पार्क, कोलवडी, पुणे येथे निलेश पाटील यांचे घराचे बांधकाम घेतले होते. तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या एकूण 48,500रुपये किंमतीच्या सेंटरिंगच्या लोखंडी पत्र्याच्या 3×2 फूट लांबी रुंदीच्या प्लेटा एका बंद खोलीत कुलूप लावून ठेवलेल्या होत्या त्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने खोलीचा कडी कोयंडा व कुलूप तोडून  चोरून नेलेवरून गुन्हा दाखल होता. पोलिसांनी वेगाने तपास करत  दोघांना अटक केली आहे

     गुन्हे शोध पथक लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना फिर्यादी यांनी फोनवरून कळविले की, दोन संशयित इसम मोटार सायकल वरून लोखंडी प्लेट घेऊन जाताना पाहिले असल्याची माहिती दिल्याने सदर  इसमांचा गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून ताब्यात घेवून सदर मालाबाबत, त्यांचे ताब्यातील मोटार सायकल व त्यांचे अस्तित्वाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पो स्टे कडे आणून कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे आरबाज मन्सूर खान वय 19 वर्षे, रा. काका नगर, केसनंद, पुणे सागर संतोष जाधव वय 22 वर्षे, रा. लाडोबा वस्ती, केसनंद, पुणे अशी सांगून सदरचा माल शुभंकर पार्क, कोलवडी  येथील बांधकाम साईट वरून चोरलेबाबत तसेच त्यांचे ताब्यातील मोटार सायकल क्र. MH12NH 9135 लाल काळे रंगाची होंडा शाईन ही देखील काळूबाई नगर, वाघोली येथून चोरलेबाबत सांगितले.

सदर गाडीबाबत लोणीकंद पोलीस ठाणे येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील एकूण मालापैकी 21,000रुपये किंमतीच्या 42 लोखंडी पत्र्याच्या प्लेटा व दुसऱ्या गुन्ह्यातील 30,000रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आले असून आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.            

 सदर कामगिरी मा.डॉ. अभिनव देशमुख सो (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. विवेक पाटील सो (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), मा.डॉ. सई भोरे पाटील सो (उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली विभाग), श्री. प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक) या वरिष्ठांच्या मार्ग दर्शना खाली पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here