आणीबाणी लादणार नाही पण दिवाळी अशी साजरी करा मुख्यमंत्री ठाकरे


या वर्षी दिवाळी साजरी करा अगदी साध्या पद्धतीने इमारतीला वा घराला सजवा रोशनाई करा,  भरपूर दिवेही लावा, फटाके  वाजवा , पण मर्यादित स्वरूपात वाजवावेत, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केला आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून फटाके वाजवू नयेत. मर्यादित स्वरूपात फटाके वाजवावे ज्यामुळे प्रदूषण पसरणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितला आहे.  दिवाळीत मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची  आणीबाणीला लादणार नाही, पण दिवाळीत  आपण सर्वांनी प्रदूषण पसरवणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळावा, अशा रीतीने दिवाळी साजरी केली पाहिजे.लॉकडाउनच्या काळात सर्वांनी सहकार्य केलं . त्यामुळे आज आपण कोरोना पासून दूर आहोत. परंतु  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची  चिंता माझ्या मनात आहे. दुसरी लाट येऊ नये यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला गेले. काही दिवस महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा वाढता आलेख आपण जिद्दीने खाली आणला आहे.  काही लोक म्हणत होते की परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली आहे. मात्र त्यांना उत्तर मिळाले आहे. दिल्लीत तर करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. प्रदुषणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये , यासाठी काळजी घ्यावी या पद्धतीनेच आपण या वर्षीची दिवाळी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे . तसेच गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्क लावला नाहीतर  दंड भरावाच लागणार मास्क न लावणारा एक माणूस 400 लोकांना  संक्रमित  करू शकतो. त्यानंतर चारशे जण किती जणांना   संक्रमित  करू शकतात याचा विचार आपण करू शकणार नाही. त्यामुळे मास्क लावला नाही तर कारवाई केली जाणार, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनावर लस आलेली नसल्यामुळे मास्क हे आता आपलं पहिलं शास्त्र आहे आणि ते आपण सगळ्या नी वापरले पााहिजे.

3 COMMENTS

  1. I haven¦t checked in here for some time as I thought it was getting boring, but the last several posts are good quality so I guess I will add you back to my daily bloglist. You deserve it my friend 🙂

  2. I do agree with all the ideas you have presented in your post. They are very convincing and will definitely work. Still, the posts are very short for newbies. Could you please extend them a little from next time? Thanks for the post.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here