अयोध्या येथील मंदिराच्या पुढील योजनांच्या संदर्भात विहिंपची दिल्ली येथे बैठक, गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना निमंत्रण

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी
नेवासा : अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या पुढील योजनांच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची विचार विनिमय करण्यासाठी दि.१० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे बैठक महत्वपूर्ण बैठक होत असून , श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. सदरची बैठक दि.१० व ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस चालणार आहे.
  या बैठकीच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे,केंद्रीय मंत्री अशोक तिवारी,उपाध्यक्ष जिवेश्वर मिश्र यांनी आपल्या स्वाक्षरीद्वारे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना निमंत्रण दिले असून या दिलेल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या येथील नियोजित मंदिराचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.५ ऑगस्ट रोजी पार पडले. त्यामुळे संपूर्ण विश्वातील हिंदू समाजामध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून, मंदिर निर्माणचे कार्य ही हळुहळु प्रगती करीत आहे.
    अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी दि.१० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचे पहिले सत्र पार पडणार आहे. तर बुधवार दि.११ नोव्हेंबर रोजी बैठकीचे दुसरे सत्र सकाळी ९ वाजता होणार आहे. मंदिर निर्मितीसाठी अजून काय उपाययोजना करता येईल या करिता सूचना करण्यासाठी  दिल्ली येथे होणाऱ्या नियोजन बैठकीस आपण उपस्थित राहून सूचना कराव्यात अशी विनंती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे,केंद्रीय मंत्री अशोक तिवारी व उपाध्यक्ष जिवेश्वर मिश्र यांनी निमंत्रण पत्रात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here