रणजी मध्ये हीरो तर आयपीएल मध्ये झीरो


आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स संघ १४ सामन्यात १२ गुणांसह शेवटच्या स्थानावर राहिला. हा संघ फलंदाजी व गोलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. याच हंगामात राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकत या वेगवान गोलंदाजाला तब्बल ३ कोटी रुपये मोजले होते. आता त्याच उनाडकतची एक विकेट राजस्थानला तब्बल ७५ लाखांना पडली आहे.अशी राहिली जयदेव उनाडकतची कामगिरीजयदेव उनाडकतने

आयपीएलच्या या हंगामात ७ सामने खेळले. त्याची कामगिरी इतकी खराब होती की त्याला ७ सामन्यात डगआऊटमध्ये बसावे लागले. ज्या ७ सामन्यात तो खेळला त्यात त्याने ५७च्या अतिशय खराब सरासरीने केवळ ४ विकेट्स घेतल्या. कमीत कमी ४ विकेट्स घेतलेल्या गोलंदाजांमध्ये नवदीप सैनी, कृणाल पंड्या व सुनिल नारायणननेच एवढ्या खराब सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. उनाडकतला लिलावात मिळालेले पैसे पाहिले तर त्याची एक विकेट अंदाजे ७५ लाख रुपयांना राजस्थानला पडली आहे.२०१८मध्ये उनाडकतची विकेट ठरली होती सर्वात महागउनाडकतला २०१८मध्ये राजस्थान संघाने ११.५ कोटी रुपये मोजत संघात घेतले होते. त्याने २०१८मध्ये १५ सामन्यात गोलंदाजी करताना ४४.१८च्या सरासरीने केवळ ११ विकेट्स घेतल्या होत्या.

त्याची एक विकेट २०१८मध्ये तब्बल १.०४ कोटी रुपयांना पडली होती. तो आयपीएल २०१८मधील बेन स्टोक्सनंतरचा दुसरा सर्वात महाग खेळाडू ठरला होता.२०१९मध्येही राजस्थानने उनाडकतला तब्बल ८.४० कोटी रुपये मोजत संघात घेतले होते. त्या हंगामात त्याने ११ सामन्यात १० विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हाही त्याची एक विकेट ८४ लाखांना राजस्थानला पडली होती. गेल्या ३ हंगामात करोडपती ठरलेला उनाडकत एकदाही साखळी फेरीचे १४ सामने खेळू शकला नाही.*रणजी स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आयपीएलमध्ये ठरतोय फ्लॉप*जयदेव उनाडकतने रणजी ट्रॉफी २०१९-२०मध्ये १० सामन्यात १३.२३च्या सरासरीने ६७ विकेट्स घेतल्या.

रणजी स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. यापुर्वी आशुतोष अमन या गोलंदाजाने २०१८-१९मध्ये ६८ विकेट्स घेतल्या होत्या. सौराष्ट्राला २०१९-२०चे विजेतेपद मिळवून देण्यात कर्णधार राहिलेल्या उनाडकतने सर्वात मोठी कामगिरी केली होती.

5 COMMENTS

  1. It’s a pity you don’t have a donate button! I’d most certainly donate to this excellent blog! I guess for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to my Google account. I look forward to new updates and will talk about this blog with my Facebook group. Chat soon!

  2. You actually make it seem really easy along with your presentation but I in finding this matter to be actually something that I feel I would never understand. It kind of feels too complicated and extremely large for me. I am having a look ahead on your subsequent post, I’ll try to get the grasp of it!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here