ड्रेस प्रकरणी निर्माता नाडियावाल यांच्या पत्नीला केली अटक

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर बरेच ड्रग रॅकेट समोर आले. यामध्ये बॉलीवूड कनेक्शन असल्याचंही स्पष्ट झालं. आता याच प्रकरणात निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला एनसीबीने अटक केली आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांनी ही माहिती दिली.

यापूर्वी छाप्यात एनसीबीच्या पथकाने फिरोजच्या घरातून ड्रग्ज जप्त केले होते. बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्जचं जाळं आज चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्यापर्यंत पोहचलं आहे. लवकरच एनसीबी चौकशीसाठी फिरोजला समन्स पाठवेल, अशी शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजच्या घरी एनसीबीच्या सर्च ऑपरेशनमध्ये दहा ग्रॅम गांजा, तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईच्या पथकाने काल मुंबईतील पाच ठिकाणी छापा टाकला.

हा रेड ड्रग्ज पॅडलर्स आणि सप्लायरची धरपकड करण्यासाठी टाकली आहे. यात सुमारे 4 ते 5 ड्रग पॅडलर्स सप्लायर्सला ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून त्यात गांजा चरससह आणखी एक औषध जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर रोकडसह वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here