अंबड येथील जंगलात प्रेमी ‘युगल’ची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

अकोले : तालुक्यातील अंबड येथील मोठे दळ सुतारदरा येथील वन जंगलात तरुण प्रेमी युगलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना घडली.            

समजलेली माहिती अशी कि, अंबड येथील मोठे दळ सुतारदरा येथील वन जंगलात दुपारी मुले सिताफळ तोडण्यासाठी गेले असता, त्यांना एका शिसवाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक तरुण व तरुणी दिसल्याने त्यांनी पोलिस पाटलांना कळविल्याने अकोले पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले.
 

 यावेळी तरूणाच्या अंगात चॅाकलेटी रंगाचे जर्कींग,काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, तर तरुणीच्या अंगात निळ्या रंगाचे कमिज व गुलाबी रंगाची सलवार आहे. दोघांचे मृतदेह कुजलेले असल्याने  मृतदेहाची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा सदर घटनेतील तरुण हा अंबड गावातीलच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत अंबड येथील पोलिस पाटील भाऊसाहेब कारभारी कानवडे यांनी अकोले पोलिस स्टेशनला खबरी वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here