ऑनलाइन खरेदी करताय… सावधान! बिग बास्केटवर सायबर अटॅक 2 कोटी लोकांची माहिती चोरली

लॉक डाऊन मध्ये सामान्यातल्या सामान्य लोकांनाही ऑनलाईन खरेदीची सवय लागली होती. आज टूथपेस्ट असेल किंवा डोक्याला लावायचा शाम्पू असेल किंवा खायचे एखादी वस्तू असेल या सगळ्या वस्तू ऑनलाइन मागवल्या जातात.ऑनलाईन मागवताना या कधी ऑनलाईन पे केलेल्या असतात किंवा गुगल पे , पेटीएम ,क्रेडिट कार्ड अशा माध्यमातून या वस्तूंचं पेमेंट केले जातात. या पेमेंट द्वारे ग्राहकाची माहिती कंपनीकडे आलेली असते.

अशाच कंपनीमध्ये लोकांची माहिती चोरीला गेली असल्याचं समोर आला आहे. भारतात चालू असलेले पण चीनची गुंतवणूक असलेले बिग बास्केट ऑनलाइन किराणामाल विकणारा कंपनीवर सायबर हल्ला झाल्याचं समोर आला आहे . सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती चोरली गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ही माहिती डार्कवेबवर 30 लाख रुपयांना विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी इंटेलिजन्स फर्म “साबल इंक” ने माहिती दिली आहे

सायबल इंकच्या ब्लॉग पोस्टनुसार, जी माहिती चोरीला गेली आहे त्यामध्ये ग्राहकांची नावं, ई-मेल आयडी, पासवर्ड, पिन, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, आयपी अड्रेस आणि ठिकाणं आदी संपूर्ण माहितीचा समावेश आहे. बंगळुरूस्थित असलेल्या बिग बास्केट कंपनीने शहरातील सायबर क्राईम सेलमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कंपनी सध्या माहिती चोरल्याच्या दाव्याची पडताळणी आणि विश्लेषणात व्यस्त आहे.

बिग बास्केटनं म्हटलं की, आम्ही ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनियतेला प्राधान्य देतो. ग्राहकांचा फानान्शिअल डेटा आम्ही स्टोअर करत नाही, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड्सचे नंबर वैगरेंचा समावेश असतो. आम्ही खात्री देतो की ग्राहकांची फानान्शिअल माहिती सुरक्षित आहे.
सायबल ब्लॉगच्या पोस्टनुसार, बिग बास्केटच्या ग्राहकांच्या माहितीची चोरी १४ ऑक्टोबर २०२० रोजी झाली होती. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या व्यवस्थापनाला याबाबत सूचित करण्यात आलं होतं.

3 COMMENTS

  1. What i don’t realize is if truth be told how you are now not really a lot more well-preferred than you may be now. You’re so intelligent. You understand thus significantly with regards to this topic, produced me in my opinion consider it from numerous numerous angles. Its like women and men are not involved except it is one thing to do with Lady gaga! Your own stuffs outstanding. All the time take care of it up!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here