श्रीगोंद्यात घरफोडी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा माल लंपास 

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी  
श्रीगोंदा :  शहरातील बालाजी नगर मधील डॉ.विक्रम बलभीम भोसले (कसरे ) यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील अंदाजे तीस  तोळे सोने आणि रोख रक्कम  दोन लाख असा एकूण  सोळा ते सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल आणि याच परिसरातील  बाळासाहेब जंगले याचे घरातील दीड किलो वजनाचे चांदी चे ऐवज   घराचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे.

शहरात बालाजी नगर मध्ये मातोश्री हॉस्पिटलचे मालक डॉ.विक्रम भोसले हे पत्नी सह बाहेरगावी गेले असल्याने, त्यांच्या  हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञान चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला.  त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे जुने नवे दागिने अंदाजे तीस तोळे सोने दागिने तसेच रोख रक्कम दोन लाखाच्या आसपास चोरी करून नेली.घरात लग्न कार्य असल्याने त्यांनी लॉकर मधून काढून आणलेले दागिने घरात ठेवलेले होते.
त्यांच्या घरात कुणी नसल्याने चोरट्याना संधी मिळाली, याचा फायदा घेत घरातील दोन्ही कपाटे खोलून मुद्देमाल लंपास केला. जुने नवे दागिने असा  काही लाखांच्या घरात ऐवज तसेच रोख रक्कम दोन लाख या चोरट्यांनी लांबवली . सकाळी हॉस्पिटलच्या कामगारांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले.  घराचा दरवाजा तोडलेला पाहून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. याबाबत डॉ.विक्रम भोसले यांनी श्रीगोंदा पोलिसात अज्ञान चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

तसेच याच परिसरात  बालाजी विहार मध्ये राहणारे प्रा.बाळासाहेब जंगले हे गावाकडे गेले असल्याने त्यांच्य  घराचा दरवाजा तोडून त्यांच्या घरातील  ,चांदीचे  दागिने, देवाच्या मूर्ती अंदाजे दीड किलो वजनाची एकूण चांदी अज्ञान चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी जंगले यांचे घर फोडण्यापूर्वी अपार्टमेंटच्या खाली बसून दारू पिऊन तिथेच दारूच्या बाटल्या टाकल्याचे निदर्शनास आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दोन्ही ठिकाणी भेट दिली. घटनास्थळी ठसे तज्ञ  तसेच श्वान पथक बोलावण्यात आले होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here