शिक्षकांमध्ये सशक्त भारत घडविण्याचे सामर्थ्य

एका वृत्तपत्र शिक्षका संदर्भात अपशब्द वापरण्यात आले. याविषयी शिक्षकांनी राग व्यक्त केला, शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सतिष उखर्डे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनी दिलेले व्याख्यान,

काल एका वृत्तपत्रात शिक्षकांना मास्तरडे म्हटलं, असे म्हणून त्याने आपली बौद्धिकता दाखवून दिली. शिक्षकांमध्ये सशक्त भारत घडविण्याचे सामर्थ्य असते ही बाब तो विसरला असावा कदाचीत.


शाळेत शिक्षक मुलांना तन्मयतेने शिकवून आपले ज्ञानदान तर करतोच, त्या संदर्भातली सर्व शैक्षणिक कामे ही करतो. त्यासोबतच तो शासनाने सोपवून दिलेली अन्य कामांची जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडतो. तो जनगणना करतो, सर्व प्रकारच्या निवडणुकांची कामे करतो, सर्व प्रकारचे सर्व्हे- कुटुंब सर्व्हेक्षण असेल, पशुगणना असेल, आर्थिक गणना असेल वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय अहवाल, त्यात विविध प्रकारचे शैक्षणिक/सामाजिक अहवाल सुद्धा…! आणि कोरोना लॉकडाऊन काळात म्हणाल तर शिक्षक काय नुसता बसून नव्हताच तो क्वारंनटाईन सेंटरला ड्युटी बजावत होता.

चेकपोस्टवर पोलिसांसोबत काम करत होता. शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेच ना! मग देशातल्या किंवा राज्यातल्या तीस ते पस्तीस टक्के मुलांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहोचतं त्यात शिक्षकांचा काय दोष? मोबाईल नसलेल्या सर्व मुलांपर्यंत त्याला पोहचता येत नाही परंतु, शक्य होईल तेवढया मुलांपर्यंत covid-19 चे सर्व नियम पाळून तो आजही घरोघरी जाऊन थोड्या फार प्रमाणात जसे होईल तसे पाच-दहा विद्यार्थी घेऊन ज्ञानदानाचे काम करतोच आहे.

एवढचं काय मग तो आपल्या हक्कासाठी भांडला तर काय बिघडले? त्यात कोणाच्या पोटात दुखायचे काही कारण नाही, त्याच्याकडे देण्यासाठी ज्ञानी ही सर्वोत्तम गोष्ट आहे, ज्यातून उद्याचा सशक्त ज्ञानी भारत देश निश्चित घडेल! विद्यार्थ्यांच्या अंतकरणात अध्ययन,चिंतन, मनन, जिज्ञासा, श्रमप्रतिष्ठा, आत्मविश्वास, राष्ट्राभिमान, वक्तशीरपणा, कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा यातून तो ज्ञानाचे अंतिम क्षितिज गाठण्याचा प्रयत्न शिक्षकांमुळेच करतो. आणि त्यातूनच देशाचे जबाबदार, कार्यक्षम,करारी नागरिक निर्माण व्हावेत म्हणून शालेय स्तरावर आपले कर्तव्य बजावत असतो. व्यक्तीचे जीवन सुखी, संपन्न, समृद्ध करण्यात त्याचा परिवार, परिसर, समाज याबरोबरच शिक्षकांचेही योगदान खूप महत्त्वाचे असते. आज आपण ज्ञान, विज्ञान,तंत्रज्ञान, मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, वाड:मय, कृषी,उद्योग, व्यवसाय यामध्ये गरुडभरारी घेतली आहे ना….ती कोणामुळे घेतली तर फक्त ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here