श्रीरामपूरात बाजारपेठेत खरेदीदारांची लगबग

राष्ट्र सह्याद्री। प्रतिनिधी

श्रीरामपूर :
दिवाळी सण जवळ येवून ठेपल्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.
साहित्य खेरदी करण्यासाठी खरेदीदारांची बाजारपेठेत रेलचेल पहावयास मिळत आहे. दागिने, रंगबेरंगी नवीन कपडे, फराळांच्या दुकानासह कपड्यांचे दुकाने, व फराळाच्या दुकानही सज्ज झाले आहेत. त्यामुळे खरेदीला वेग आला आहे. यंदा कोरोनाचे संकट असतानाही तरी देखील श्रीरामपूर मेनरोड व शिवाजी रस्ता परिसरातील बाजारपेठेत खरेदीला उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दुकानात थाटलेल्या वस्तुनी खरेदी करणारे ही आकर्षीत होत आहेत. रांगोळ्या, पणत्या, फराळ, आकाशदिवे, दागिने, लक्ष्मी, आदी ‘ सह ‘ फटाके आणि दिवाळीच्या साहित्यांनी दुकाना गजबजलेल्या आहेत.

बाजारात नव -नवीन प्रकारचे कपडे, साड्या, पंजाबी ड्रेसस, थंडी पासून बचावासाठी लागणारे उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी येताना दिसुन येत आहे. सण – उत्सवाच्या काळात अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याने बाजारपेठेत उत्साह निर्माण झाला चित्र पहावयास मिळत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here