किरकोळ भांडणातून डोक्यात खोरे मारून एकाचा खून

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

वाघोली : किरकोळ भांडणातून डोक्यात खोरे मारून परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली,याप्रकरणीएका परप्रांतीय तरुणास ताब्यात घेतले आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता,न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.  

याप्रकरणी लोणीकंद पोलीसात फिर्यादी सुरेश प्रतापराव शिंदे वय 67 वर्षे, रा. औंध, पुणे यांनी फिर्याद दिली की, दि. 7 रोजी रात्रीच्या सुमारास तुळापूर गावचे हद्दीत कळमदरा येथे सर्व्हे नं 144 मधील  शेतात षटकोनी मनोऱ्याचे बांधकामां जवळ इसम नावे रॉबिन शोयलिन सद्दार वय 27 वर्षे, रा. पश्चिम बंगाल याने किरकोळ भांडणातून उत्तम राजेंद्र नाथ नासकर वय 46 वर्षे, रा. पश्चिम बंगाल याचे डोक्यात खोऱ्याने मारून त्यास जिवे ठार मारले आहे. वगैरे मजकूर वरून गुन्हा दाखल होता. म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वतः तसेच सोबत गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

संशयित आरोपी बाबत माहिती घेता तो कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नसल्याने त्यास पकडणे अवघड व जिकिरीचे होते. परंतु फिर्यादी व त्यांचे बांधकामावरील काँट्रॅक्टर रिझाऊल अब्दुल मुल्ला यांनी दिलेल्या आरोपीचे वर्णनानुसार त्याचा लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या टीम करून शोध पथकाने सदर आरोपीचा कसून शोध घेतला असता तो फॉरेस्ट चे जागेत तुळापूर येथे एका झाडाखाली बसलेला मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रॉबिन शोयलिन सद्दार वय 27 वर्षे, रा. जयनगर, पश्चिम बंगाल असे सांगून रात्री उत्तम व त्याचेमध्ये शाब्दिक वाद होऊन त्याच रागात त्याचे डोक्यात खोऱ्याने मारलेबाबत त्याने सांगितले.

आरोपी सध्या पोलीस कोठडी मधे आसुन सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.       

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक .डॉ. अभिनव देशमुख ,  अप्पर पोलीस अधीक्षक  विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारीअनिल लांभाते , निरीक्षक प्रताप मानकर या वरिष्ठांच्या मार्ग दर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here