लघु पाटबंधारे अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून संभाजी ब्रिगेडची गांधीगिरी …. “बंधारा लिकेज झाला तर,पोते घालून बंद करू” अधिकाऱ्यांचे बेजबाबदार वक्तव्य ..

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी


श्रीगोंदा : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल दि. ०९ नोव्हेंबर रोजी गांधीगिरी करत अनोखे आंदोलन केले. येथील स्थानिक स्तर लघुपाटबंधारे उपविभागीय अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून,  झालेल्या निकृष्ठ कामांचा निषेध करण्यात आला.

स्थानिक स्तर लघुपाटबंधारे  खात्यामार्फत नव्याने १९ बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या बंधाऱ्याला गेट टाकण्यासाठी २३ ऑक्टोबरला निवेदन दिले होते. त्यानंतर दि. ०९नोव्हेंबर रोजी हिंगणे मळा बंधाऱ्याचे पाणी लिकेज असल्याने ते त्वरित बंद करावे. तसेच, उर्वरित बंधाऱ्यांना गेट बसवण्याबाबत उप विभागीय अभियंता जलसंधारण उपविभाग, श्रीगोंदा या कार्यालयाला निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे.

यात हिंगणे मळा बंधारा, आंबील ओढा याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती चालू असून, ही गळती बंद होण्यासाठी त्वरित कारवाई करावी, बंधाऱ्याचे लिकेज न काढल्यास २३ नोव्हेंबर रोजी कोरड्या बंधाऱ्यात आमरण उपोषण करणार असल्याचे, नमूद केले आहे. याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष अरविंद कापसे, तालुकाध्यक्ष नाना शिंदे, मयूर आढाव आधी उपस्थित होते.

अधिकाऱ्याचे बेताल वक्तव्य
उप विभागीय अभियंता जलसंधारण उपविभाग श्रीगोंदा हे आंदोलकांना ‘बंधारा लिकेज झाला तर, पोते घालून बंद करतो’ सांगतात, अश्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे साधारण ५८ लाख रुपये पाण्यात गेला की काय असा प्रश्न आत्ता आसपासच्या शेतकऱ्यांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here