शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळाला

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

श्रीगोंदा प्रतिनिधी-  तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी विजेचे शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचे लोळ उसात पडून तब्बल चार एकर उस जळून खाक झाला आहे. तरी याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक नवले यांनी शेतकऱ्याच्या शेतातील उसाला कारखान्यामार्फत विमा कवच देण्याची मागणी केली आहे.
                                                 

तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील भिंगानमार्गे श्रीगोंदा रोडवर घोड कॅनल नजीक गट नं. २८४ मध्ये भानुदास भिसे व बापूराव भिसे यांची शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीत दोन्हीही भावांनी उसाची लागवड केली होती. सध्या गळीत हंगाम सुरु झाल्याने पहिल्याच टप्पात त्याच्या उसाला कारखान्याकडून तोडणी भेटली होती त्यामुळे उसतोड चालू असताना शेताच्या वरून जाणाऱ्या विजेच्या तारांमध्ये घर्षण होवून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ शेतात पडू लागले त्यातील एक विजेची तार एका बंद असलेल्या लाईनवर कोसळली त्यामुळे पुन्हा एकदा आगीचा मोठा डोंब उसळला आणि उसाने पेट घेतला.

घटनास्थळी आग विजवण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे सर्वाना बघ्याची भूमिका घ्यावी लागली मात्र पोटाला पिळा देवून जगवलेला उस डोळ्यासमोर जळताना पहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले त्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक नवले यांनी सर्व कारखानदाराकडे सर्व शेतकऱ्यांच्या उसाला कारखान्याकडून विमा कवच देण्याची मागणी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here