दिल्ली येथील विहिंपच्या बैठकीत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांची उपस्थिती,


राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

नवी दिल्ली: अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या पुढील योजनांबाबत दिल्ली येथे मंगळवारी दि.१० नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित बैठकीत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी सहभाग घेऊन श्रीराम मंदिर निर्मिती बाबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.चार लाख गावात जाऊन अकरा कोटी परिवारातून प्रतीव्यक्ती दहा रुपये प्रमाणे मंदिर निर्मितीसाठी निधी उभा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
       

दिल्ली येथे श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे महा सचिव श्री चपंत राय यांच्या समवेत मंदिर निर्माण नियोजन समितीची बैठक दि.१० नोव्हेंबर व दि.११ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील आनंदधाम मध्ये आयोजित करण्यात आली असून या चर्चेत महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना निमंत्रित करण्यात आले होते.
   

या नियोजन बैठकीत चौदा लाख गावापर्यंत जाऊन अकरा कोटी परिवारातून प्रत्येकी १० रुपये प्रमाणे मंदिर निर्मितीसाठी निधी  गोळा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.तर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र स्ट्रस्ट च्या ६७ एकर जागेत अतिथी भवन,अनुसंधान केंद्र,प्रशासकीय इमारत,प्रदर्शनी,तीर्थयात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा,संगीत कारंजे,पार्किंग व्यवस्था,२१ कोटी खर्चाच्या डिजिटल लायब्ररीची घोषणा,श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्रा च्या माध्यमातून नेपाळ,भूतान,पाकिस्तान, बांगलादेश या ठिकाणी राम महिमा पोहचण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
    

परमपूज्यनिय अवधेश्रानंदजी महाराज अध्यक्षस्थानी होते.या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोककुमार यांनी प्रास्ताविक केले.श्रीराम मंदिर निर्माणासाठी परिवार संपर्क साधून निधी संकलन अभियान विषयी त्यांनी माहिती दिली.रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र स्ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंदगिरी जी महाराज यांनी यावेळी मार्गदर्शन करून महत्वपूर्ण सूचना केल्या.
       

गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी हिंदू बांधवांच्या योगदान  नियोजित उभारण्यात येणाऱ्या मंदिरासाठी असावे म्हणून बैठकीत ठरल्याप्रमाणे दि.१५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सर्वांनी प्रती व्यक्ती दहा रुपये देऊन या मंदिर निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.तर महाराष्ट्र राज्यात पालघर येथील साधुंवर झालेल्या हल्ल्या हा एक कलंक असून या कलंकाने आम्ही दुःखी झालो असल्याच्या भावना यावेळी बोलतांना व्यक्त केल्या.
      

अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिल्ली येथे आयोजित  नियोजन बैठकीस शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, यांच्यासह चार ही पिठाचे शंकराचार्य, श्रीराम जन्मभूमी स्ट्रस्टचे  महासचिव श्रद्धेय चंपतराय,महंत सुधांशु महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह कार्यवाह भैय्याजी जोशी,साध्वी ऋतूंभरादेवी,केंद्रीय धर्माचार्य व संपर्क प्रमुख अशोक तिवारी,उमेशानंद महाराज (उज्जैन) विश्व हिंदू परिषदेचे विभागीय मंत्री अँड.सुनील चावरे, देवगडचे संत सेवक संदीप साबळे यांच्यासह संत महंत मंडळी उपस्थित होती.

अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर पुढील नियोजनाबाबत चर्चा


चौदा लाख गावात जाऊन प्रतीव्यक्ती दहा रुपये प्रमाणे मंदिर निर्मितीसाठी निधी उभा करण्याचा निर्धार
श्री राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव श्री चपंत राय यांच्या सोबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीप्रसंगी चर्चा करतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here