किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे : भाजपची मागणी


मुंबई : महाविकास आघाडी सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे अशी आमची मागणी आहे, असे सांगत भाजपचे माजी मंत्री गिरीष महाजन यांनी सरकारवर टीका केली आहे.

राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अधिवेशनाचा कालावधी किती असावा याबाबतचा निर्णय १ डिसेंबर रोजी परिस्थीतीचा आढावा घेऊन ठरवला जाणार आहे. गिरीष महाजन यांनी ‘किमान १५ दिवस अधिवेशन व्हावे अशी भाजपची भूमिका असल्याचे म्हटले आहे.


ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशन कालावधी कमी ठेवायचा, चर्चा फार करायची नाही अशी सरकारची भूमिका दिसते आहे. पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे ही आमची मागणी होती.’ तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे की, ‘शेतीच नुकसान, मराठा आरक्षण यावर सरकरला चर्चा करायची नाही असे वाटते आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री कोरोनाचे कारण देत असतील तर कोरोना स्थिती हातळण्यात कमी पडले का?’ असा आमचा सवाल आहे.

4 COMMENTS

  1. I?¦m now not positive the place you’re getting your info, however great topic. I needs to spend some time finding out much more or understanding more. Thanks for excellent info I was searching for this info for my mission.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here