..या कामगारांची दिवाळी रंगणार फडात !

लोहगाव-(प्रतिनिधी)
यावर्षी सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उसाचे क्षेत्र सर्वत्रच चांगले व डौलाने डोलताना दिसत आहे त्यातच ऊस कारखाने या वर्षी दिवाळीच्या आधीच चालू झाल्यामुळे ऊस तोडणी कामगारांची दिवाळी आता घरी साजरी करण्याऐवजी उसाच्या फडात संपन्न होणार आहे. 

गत दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले असल्याने नगर जिल्ह्यासह राज्यात उसपिकाची मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे.यंदा मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीखालील क्षेत्र असल्याने या गळीत हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना उपलब्ध उसाचे गळीत होणे दुरापास्त दिसत असल्याने दिवाळी नंतर उसतोडीला येणारे ऊस तोडणी मजूर दिवाळी आधीच कारखान्याच्या शेतकी विभागाला आणावे लागले आहे.त्यामळे या ऊसतोडणी कामगारांची दिवाळी आता ऐन थंडीत फडातच रंगणार आहे.त्यासाठी

ऊस क्षेत्र असणाऱ्या ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी कामगारांचे अड्डे दिसू लागलेले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार आता कारखान्याच्या परिसरात टोळ्या घेऊन कारखाना परिसरात मुक्काम ठोकला आहे.

मुकादमाकडून घेतलेली आगाऊ उचल कर्ज घेऊन बैलगाड्या सज्ज झालेल्या आहेत.सामान्य नागरिकांची एकीकडे दिवाळीच्या सणाची लगबग सुरू झालेली असताना दुसऱ्या बाजूने पोटाची खळगी भरण्यासाठी हे ऊस तोडणी कामगारांनी सणसुद विसरून साखर कारखाना परिसरात मुक्काम ठोकला आहे.या महिन्यात ऊसतोडणी कामगार आपला थोडीफार शेत जमिनीची खरिपाची पिके तयारी केली आणि रब्बीचे पेरणी केली आपल्या शेतात कामे उरकून तो ऊस  तोडणी साठी तयार झाला आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी थंडी वाऱ्याची पर्वा न करता आम्हाला कारखान्याची वाट धरावी लागते.त्यांचे हे शल्य त्यांच्या तोंडून लपून लाहीले नाही.पोरांच्या शिक्षण,मुलींचे लग्न,कार्यासाठी संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी  आम्हाला आमचा तांडा कारखान्याकडे नेऊन उचल फेडावी लागते.

एक मात्र खरे पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न मिटतो. एवढी यातायात  करूनही कर्जत फिटले नाही तर बैलाची जोडी विकून कर्ज फेडावे लागते. पुढच्या वर्षी परत एक-दोन करत जमा पुंजी गाठी बाळगण्यासाठी तडफडावे लागते. अशी काही ऊस तोडणी कामगारांनी व्यथा व्यक्त केली आहे.

या वर्षी पावसाचे प्रमाण मोठे असल्यामुळे आमच्याही भागात व परिसरात पाणी टिकून आहे.परंतु ऊस तोडणी केल्याशिवाय आमच्या संसाराला हातभार लागत नाही. त्यातच आता अतिरिक्त ऊस तोडणीचे संकट उभे ठाकले आहे. उसाचे क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात आहे परंतु बिबट्याच्या धास्ती मुळे ऊस तोडणी कामगारांना थोडे जपूनच उसाच्या थळात प्रवेश करावा लागतो. उसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे यंदा तोडणी कामगारांची दिवाळी गोड मानून घ्यावी लागणार आहे एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here