आमदार मोनिकाताई राजळे यांच्या घराकडे जाणार्‍या मोर्चेकरी आंदोलकांना पोलीस प्रशासनाकडून अटक

शेवगाव:
शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी आज तिसऱ्या दिवशीही संपावर गेले असताना. कामगारांनी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अलीकडेच मुंडे पुतळ्यासमोर पोलिसांकडून अडविण्यात आले व त्यांना अटक करण्यात आली. यावेळी आंदोलकांकडूनआमदार मोनिका राजळे व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार नसल्यामुळे कामगारांमध्ये मोठा आक्रोश पाहावयास मिळत आहे. तसेच नगर परिषद ही भाजपाच्या ताब्यात असून भाजपा नगर सेवकांमध्ये ताळमेळ नसल्याचेही समोर आले आहे. मुख्य अधिकारी मात्र हताशपणे या सर्व गोष्टींकडे पाहण्या पलिकडे काहीच करत नसल्याचे दिसत आहे.
कामगारांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घडविण्यात आल्या नंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यासमोर बसून बैठा सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केला असता. त्यांना शेवगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली.
यावेळी मोठे पोलीस छावणीचे स्वरूप मुंडे पुतळ्यासमोर प्राप्त झाले होते. यावेळी अटक करण्यात आलेले वंचित बहुजन चे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण , प्यारेलाल भाई शेख, मनसेचे गणेश रांधवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगडे,प्रवीण भराट सर,रेश्मा गायकवाड,दत्ता फुंदे, संजय नांगरे इत्यादींना पोलिसांकडून अटक करण्यात आली यावेळी मोठी घोषणाबाजी झाली.

दिवसेंदिवस शेवगाव तालुक्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे कृषी पंप, दुकान फोडी यासारखे चोरीचे सत्र थांबता थांबेना तर दुसरीकडे कुठेतरी मोर्चेकरी आंदोलकांना अटक होते किंवा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत. यामुळे शेवगाव तालुक्या ची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे चिन्ह पहावयास मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here