हिंमत जाधव खुन प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेप

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी 

राहुरी : नगर तालूक्यातील हिंमत जाधव खुन प्रकरणात रामचंद्र ऊर्फ राजू शेटे ‘ सह ‘ सात जणांना सक्तमजूरी, जन्मठेपीची शिक्षा बुधवारी (दि. ११), नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात सुनावण्यात आली. तसेच, सर्व आरोपीना एस सी व एस टी ॲक्ट आणि आर्म ॲक्टचे कलमातून दोष मुक्त करण्यात आले.
(दि. २०), सप्टेंबर २०१६ रोजी या घटनेतील मयत हिंमत जाधव (रा. वळण) तालूका, राहुरी येथील व त्यांचा मित्र संतोष चव्हाण यांच्या बरोबर अहमदनगर येथील न्यायालयात गेला होता.
नगर येथून हिंमत जाधव व संतोष चव्हाण हे दोघे मोटारसायकलवर घरी जात असताना इमामपूर घाटात दुपारी दोन वाजेच्या दरम्यान, आरोपी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे, व आजिनाथ ठोंबरे यांनी
मोटरसायकलवर पाठलाग करूनबंदुकीने गोळ्या झाडल्या

हिंमत जाधव याला जीवे मारले होते.

या बाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास डिवायएसपी आनंद भोईटे यांनी केला होता. त्यानंतर अहमदनगर येथील न्यायालयात सदर गुन्ह्याची सुनवाई सुरू झाली होती.

चार वर्षाच्या सुनावणीनंतर बुधवारी (दि.११), नोव्हेंबर रोजी सकाळी अहमदनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंजूषा देशपांडे यांच्या – समोर सुनावणी सुरू झाली. यावेळी कृष्णा अशोक कोरडे, सोमनाथ भानुदास मोरे, आजिनाथ रावसाहेब ठोंबरे, रामचंद्र ऊर्फ राजू चिमाजी शेटे, संदीप थोपटे, राहुल बाबासाहेब दारकुंडे, जावेद कयूम शेख, या सात गुन्हेगारांना भां.द.वी, कलम ३०२’ सह ‘ १२० (ब )नुसार दोषी धरण्यात आले. त्यांना प्रत्येकी सक्त मजूरीची जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजूरीची शिक्षा तसेच सर्व आरोपीना भां. द. वी, कलम १२० (ब ), करीता स्वतंत्र प्रत्येकी ७ वर्षे सक्तमजूरी, व ७ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास प्रत्यकी ३ महिने सक्त मजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.
तसेच सर्व आरोपीना एस सी,एस.टी.ॲक्ट व आर्म ॲक्टचे कलमातून दोष – मुक्त करण्यात आले.
असा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला. या प्रकरणात सरकारी वकील के. जी. केसकर यांनी काम पाहीले. या घटनेचा निकाल लागल्यानंतर राहुरी तालुक्यातील वळण येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here