विद्यार्थ्यांनी बनवले स्व निर्मित आकर्षक आकाश कंदील

नेवासा: तालुक्यातील प्रवरासंगम येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता चौथी वर्गाच्या आदर्श शिक्षिका श्रीमती शितल झरेकर-आठरे यांनी ऑनलाईन शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे प्रवरासंगम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व निर्मित आकर्षक व सर्वांना आकर्षित करणारे आकाश कंदील तयार करून दिवाळीचा खऱ्या अर्थाने आनंद द्विगुणीत केला.
प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या या आकाश कंदील कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.दिवाळी आली की आकाश कंदिलाची रोषनाई करण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरू होते,आईची घराची आवराआवर,बाबांची खरेदीची घाई,बहिणीला कोणती साडी घ्यायची याची लगबग तर मुलांना कपडे खरेदीसह आकाशकंदील बनवण्यासाठी चाललेली तयारी असे चित्र दिवाळी आल्यानंतर पहावयास मिळते.
शाळा बंद असल्याने मुलांनी ठरवलंय की या दिवाळीला आम्ही स्वतः बनवलेला आकाशकंदील घरामध्ये लावणार. असा निश्चय झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण उपक्रमाद्वारे चौथीच्या वर्गशिक्षिका श्रीमती शीतल झरेकर-आठरे यांनी या उपक्रमासाठी मुलांना मार्गदर्शन केले तयार झालेले आकाशकंदील मुलांनी रात्रीच्या प्रकाशात लावून पाहिले तर आश्चर्य काय सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य खुललेले दिसले.त्यांच्या चेहऱ्यावरचे हे हास्य घरच्या सर्वांना आनंद देऊन गेले या सर्व पालकांनी
प्रवरासंगम शाळेच्या शिक्षिका शीतल झरेकर-आठरे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या उपक्रमाबद्दल कौतुक केले.तर कु.प्रज्ञा संतोष पांडव व गौरी संदिप पांडव या भगिनी देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here