‘हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते, ‘ ओबामा यांच्या आत्मचरित्रात राहुल गांधी यांचा उल्लेख 

BERLIN, GERMANY - JUNE 19: U.S. President Barack Obama smiles as he signs the official guest book at Bellevue Palace on June 19, 2013 in Berlin, Germany. U.S. President Barack Obama is visiting Berlin for the first time during his presidency and his speech at the Brandenburg Gate is to be the highlight. Obama will be speaking close to the 50th anniversary of the historic speech by then U.S. President John F. Kennedy in Berlin in 1963. (Photo by Thomas Imo/Photothek via Getty Images)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल मोठी बाब नमूद केली आहे. ओबामा यांनी आपलं पुस्तक ‘अ प्रॉमिस्ड लँड’ मध्ये राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त ओबामा यांनी आपल्या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.“राहुल गांधी हे एक विद्यार्थी आहेत ज्यानं अभ्यासक्रम पूर्ण तर केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांच्यात ती आग नाही,” असं ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्राचा आढावा घेतला आहे. यामध्ये बराक ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आढाव्यानुसार ओबामा राहुल गांधींबद्दल म्हणतात की, “राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे गुण आहे. ज्या विद्यार्थ्यानं आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याला आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचं आहे. परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा त्याच्याकडे प्राविण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही.”

सोनिया गांधींचाही उल्लेख

बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख केला आहे. “आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युअल यांसारखे पुरूष हँडसम असल्याचं सांगितलं जातं परंतु महिलांच्या सौदर्याबद्दल सांगितलं जात नाही. यासाठी एक किंवा दोन उदाहरणंच अपवाद आहेत जसं की सोनिया गांधी,” असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.

मनमोहन सिंग यांच कौतुक 

“भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांच्यात एक खरेपणा आणि प्रामाणिकपणा आहे,” असंही ओबामा यांनी आपल्या पुस्तकात लिहलं  आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्षा व्लादिमीर पुतिन हे मशीन चालवणारे मजबूत आणि धुर्त बॉस असल्याचंही त्यांनी म्हटलं. ओबामा यांचं हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी बाजारात उपलब्ध होणार आहे. बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात २०१० आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here