दिवाळीसाठी अयोध्येत ५ लक्ष ५१ हजार दिव्यांची रोषणाई

 प्रभू रामचंद्रांची अयोध्या दिवाळीच्या निमित्ताने सजली आहे. 
गुरुवारी रात्रीपासूनच या ठिकाणी रोषणाई पाहण्यास मिळते आहे.  
अयोध्येत करण्यात आलेली ही आकर्षक रोषणाई सर्वांचे  मन मोहून घेते आहे.  
दिवाळी असल्याने शरयू नदी तीरासह संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साहाचे वातावरण आहे.  

पाच लाख ५१ हजार दिव्यांची रोषणाई आज अयोध्येत केली जाणार आहे.  अयोध्येतील शरयू तटावर तयारी सुरु आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार आहे प्रभू रामचंद्रांची अयोध्या.  

दिवाळी असल्याने अयोध्येत रामायणावर आधारित मूर्तींचं प्रदर्शनही भरलं आहे. मूर्तींचं जे प्रदर्शन अयोध्येत भरलं आहे, त्यातील प्रभू रामचंद्रांची धनुष्यधारी मूर्ती आहे. तसेच  मारुतीराया लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन जातानाची प्रतिकृती दिव्यांनी साकारण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here