दिवाळीच्या मुहूर्तावर पाकचा घुसखोरीचा प्रयत्न  

नवी दिल्ली : इकडे देश दिवाळीचे स्वागत करत आहे आणि तिकडे पाकिस्तान ने सीमेवर  पुन्हा एकदा उरी मध्ये भ्याड हल्ला केला. यामध्ये भारताची 3 जवान शहीद झालेत तर सामान्य 3 नागरिकही ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

पाक सैन्यावर भारतीय सेनेने उत्तर दिलं त्यात पाकिस्तानचे 7 सैनिक मारले गेले. मारले गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांमध्ये दोन कमांडो यांचाही समावेश आहे. अशी माहिती भारतीय लष्कर यांनी दिली आहे.

लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सैनिक जखमी झाले आहेत. या बरोबरच भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी बंकर इंधन आणि लॉन्च पॅड नष्ट झाली आहेत. 

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत उरी येथील अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे . परंतु सतर्क जवानांनी केरन सेक्टरमध्ये गोळीबार करत घुसखोरी करण्याचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला. 

उरी सेक्टरमध्ये नंबाला येथे भारताचे तीन जवान शहीद झाले. हाजी पीर सेक्टरमध्ये एका बीएसएफ इन्स्पेक्टरने देखील जीव गमावला. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येच कामलकोटे येथे तीन नागरिक ठार झाले आहेत. यांपैकी एक महिला हाजी पीर सेक्टरच्या बालकोटे येथे मारली गेली. पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत तोफगोळे आणि इतर हत्याराचांही वापर केला. मात्र भारतीय जवानांनी पाकला जशासतसे उत्तर दिले. 

6 COMMENTS

  1. I like what you guys are up also. Such intelligent work and reporting! Carry on the superb works guys I have incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my site 🙂

  2. obviously like your web site but you need to check the spelling on several of your posts. Many of them are rife with spelling issues and I find it very bothersome to tell the truth nevertheless I will definitely come back again.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here