पाकिस्तानी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

बहिरेवाडी (आजरा) :  पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ले मध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय २०) शहीद झाले आहे. कोल्हापुरातील बहिरेवाडी येथील ऋषिकेश दोन वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाला होता. कोरोना लॉकडाउनच्या काळात ऋषिकेश गावी होते महिन्यापूर्वी ते ड्युटीवर हजर झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बारामुल्ला जम्मू काश्मीर येथे ऋषीकेश हे जखमी होवून शहीद झाल्याचे प्राथमिक माहीती मिळाली आहे. ऋषीकेश दोन वर्षांपुर्वी सैन्य दलात भरती झाले आणि त्यांचे सैन्यातील ट्रेनींग पुर्ण होऊन ते ड्युटीसाठी जॉईन झाले होते.

कोरोना लॉकडॉउनच्या काळात ते गावी होते. महिन्याभरापुर्वी ते ड्युटीवर हजर झाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज मध्ये झाले होते. शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे एन. सी. सी. प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर ते सैन्य दलात भरती झाले.

त्यांच्या पश्चातआई वडील, एक बहीण असा परिवार आहे. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच ते राहत असलेल्या देवूळ गल्लीसह गावावर शोककळा पसरली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here