भीषण अपघात एका बालकाचा मृत्यू : पाच जखमी

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी
भिगवण:

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भादलवाडी हद्दीत  पिकअप व आयशर यांच्यात समोरा समोर धडक होऊन एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, इतर पाच जण जखमी झाले आहेत.  पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भादलवाडी हद्दीत काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असून देखील कोणत्याही प्रकारची खबरदारी संबंधित ठेकेदाराकडून घेण्यात आलेली नाही. (दि.११) रोजी झालेल्या पिकअप, आयशर भीषण अपघातात मध्ये एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, इतर पाच जण जखमी झाले आहेत. 

भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ( दि.११) रोजी सायंकाळी ५.३० चे दरम्यान प्रशांत भारत मासाळ(रा. अंजनगाव उमाटे,ता. माढा, जि. सोलापूर)  हे आपल्या कुटुंबाबरोबर पिकअप (एम. एच ४५ टी.००५३ ) ने गावी जात असताना सोलापूर दिशेने पुण्याकडे जाणारा आयशरने ( एम. एच ४२ टी. ०९२१) समोरून पिकअपला धडक दिल्याने स्वराज प्रशांत मासाळ (वय.४ वर्ष) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुत्यु झाला.

या अपघातात पिकअप ड्रायव्हर गणेश मोरे, प्रशांत मासाळ यांच्या पत्नी गौरी, लहान मुलगा विराज व आयशर ड्रायव्हर सुनिल पोपट मदने हे चार जण जखमी झाले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार निकम हे करित आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here