प्रतिनिधी | Rashtra Sahyadri
शिरूरकासार : संपूर्ण शिरूरकासार तालुक्यात गेली तिन वर्षांपासून एकही कापूस खरेदी केंद्र नसल्याने अत्यंत कमी भावाने आपला कापूस शेतकऱ्यांना खाजगी व्यापा-यांना घालावा लागत असल्याने मोठे नुकसान होत असून 50%शेतक-यांचा कापुस राहील्याने तालुक्यात कापुस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे अशी मागणी
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे
शिरूरकासार तालुका बीड, आष्टी या दोन मतदार संघात सामाविष्ट झाल्यापासून या तालुक्याला कोणी वालीच राहिला जोतो निवडनुकीपुरता मतदारांचा वापर करून घेतो. त्यामुळे शिरूरकासार तालुका विकासासाठी कोसो दुरच आहे. शेतक-यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाटोदा-शिरूरकासार अशी बाजार समिती असली तरी समिती असुन नसल्यासारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल भावात आपला माल खाजगी व्यापाऱ्यांना घालावा लागत असल्याने त्यांची मोठी लूट होत आहे.
गेली तिन वर्षांपासून तर तालुक्यात एकही कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. काही शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात
आपला कापूस विकला. आता 50 ते 55% शेत-यांचा कापूस घरात पडुन असुन तिन वर्षांपासून एकही कापूस खरेदी केंद्र नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड बाजार समितीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहोत.
अनेक शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिले असुन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस राहिल्याने शेतकरी चितेंत आहे.
त्यामुळे तालुक्यात एक तरी कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करणे गरजेचे असुन ते सुरु करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.