लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत चालेल, असे धोरण ठरवण्याचे आदेश
राष्ट्र सह्याद्री
कोरोनामुळे देशात पुकारलेला दुस-या लॉकडाऊनचा कालावधी उद्या संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरोना दीर्घकाळ आपल्यासोबत राहणार असून आपल्याला त्यासोबत लढा द्यायचा आहे. त्यामुळे ‘दो गज दुरी’ हा मंत्र पंतप्रधानांनी देशाच्या सर्व मुख्यमंत्र्याना दिला.
वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे आपण इतर देशांच्या तुलनेत कोरोनाला अटकाव घालण्यात मोठे यश प्राप्त केले आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण निश्चितच चांगली कामगिरी केली आहे. मात्र, भारतावरचे संकट अद्याप टळले नाही. त्यामुळे गत दोन्ही लॉकडाऊनच्या अनुभवाच्या आधारे पुढील धोरणे निश्चित करावीत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
generic tadalafil reviews – buy generic tadalafil online canadian pharmacy tadalafil