प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड – लोकनेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या आदेशावरून व भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज बीड शहरामधील आरोग्य तपासणीचा उच्चांक गाठला. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ५००० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आज २३ व्या दिवसांत ६८,००० हजार जणांची तपासणी करण्यात आली.
शुक्रवार पेठ, मंत्री गल्ली, रंगात गल्ली, शनिमंदीर परीसर,हिरालाल चौक परिसर, मोंढा परीसर व संतोषीमाता मंदीर परीसरात तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. लक्ष्मण जाधव व शासकीय आरोग्य टीम अविरतपणे सेवा देत असून मदतीला विलास बामणे, दत्ता परळकर, अमोल वडतीले, कपील सौदा सोबतच आहेत.
आज जयसिंग (मामा) चुगंडे, हनुप्रसादा पांडे, भरतमामा चुगंडे, जयमल्हार बागल, फामजी पारीख, बियाणी काका, बंटी परळकर, विशाल मोरे, घोडके मामा आदींनी आरोग्य तपासणीसाठी विशेष सहकार्य केले.
बीड पोलिस अधीक्षक साहेबांच्या म्हणणानुसार आज ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी पोलिस उप अधिक्षक सावंत साहेब व पोलिस निरीक्षक सुजीत बडे साहेब यांच्या उपस्थितीत ५४ जणांची यामध्ये काही अधिकारी व पोलिस कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये रक्तदाब, रक्तातील आँक्सिजनचे प्रमाण, रक्तातील साखरेचे प्रमाण, हदयाची ठोके व जनरल तपासणी करण्यात आली. यावेळी विक्रांत हजारी, भगिरथ बीयाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, विलास बामणे, दत्ता परळकर,राजेंद्र चरखा व अमोल वडतीले मयुर आदे नंदु इनकर यांनी या तपासणीसाठी परीश्रम घेतले.