प्रतिनिधी | राजेंद्र जैन | कडा | राष्ट्र सह्याद्री
१५ जिवंत जनावरांसह ४०० किलो गोमांस अन् टेम्पो जप्त
तालुक्यातील खडखत येथील कत्तलखान्यात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याची खबर उपविभागीय कार्यालयाला मिळाली. त्यावरुन पत्र्याच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी पंधरा जिवंत जनावरांसह चारशे किलो गोमांस व वाहतूक करणारा टेम्पो जप्त करुन फरार दोघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी दि. २ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्या कार्यालयाला खडकत (ता.आष्टी) येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती खब-याकडून मिळाली. त्या माहिती आधारे डीवायएसपींच्या पथकाने त्या कत्तलखान्यावर छापा टाकला.
त्याठिकाणी पोलिसांनी शेडमध्ये कत्तल करुन ठेवलेले चारशे किलो गोमांस, पंधरा जिवंत लहान जनावरे, वाहतूक करणारा टाटा कंपनीच्या एका टेम्पोसह जवळपास दीड लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना पाहून दोघा जणांनी पलायण केले. पोलिस नाईक श्रीराम माने यांच्या फिर्यादीवरून दोन्ही फरार आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र गोवंशीय प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सह कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि भारत मोरे करीत आहेत.
खाकीतली माणुसकी…
लहान-लहान 15 वासरांना कसायाच्या तावडीतून बाहेर काढून खाकी वर्दीतील एका दर्दी माणसाने मुक्या प्राण्यांना जीवदान दिले आहे. आष्टी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पीएसआय भारत मोरे यांनी स्वत:च्या पैशातून कोवळ्या वासरांना दुध पाजून माणूसकीचा धर्म पाळला. त्यानंतर वासरांना गोशाळेत सोडले आहे.
tadalafil 20mg – tadalafil generic name generic tadalafil 20mg