Ahmednagar: कारेगावचे भूमिपुत्र दत्तात्रय बोरुडे अहमदनगरच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर: नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पाचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांची अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणुन नुकतीच बदली झाली आहे. या संदर्भात ३० एप्रिल रोजी मंत्रालयातून आदेश निर्गमित झाला आहे.


अहमदनगर येथील कार्यरत अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर बोरुडे यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सेवेच्या हीतार्थ व प्रशासकीय कारणासाठी नगरला बदलीने नियुक्ती झाली आहे. ते मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील असुन त्यांनी याआधी अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी पदी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन जबाबदारी सांभाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here