प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका एक किलो डाळ मोफत
बीड – देशातील कोरोनाव्हायरस विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह एक किलो या परिमाणात तुरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत मोफत वितरीत करण्यात येणार आहे. तसेच उज्वला गॅस धारकांना माहे मे व जून 2020 दरमहा एक सिलेंडर याप्रमाणे एकूण दोन सिलेंडर मोफत असून गॅस सिलेंडरची किंमत दरमहा गॅस धारकांच्या खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यावे असे जिल्हाधिकारी राहुल यांनी सांगितले आहे.
बीड जिल्ह्यासाठी त्यानुसार तूरडाळ व चनाडाळ ही शासकीय गोदाम देवगिरी कॉलेज रोड, उस्मानपुरा औरंगाबाद येथून उपलब्ध होणार असून तालुक्याच्या ठिकाणाच्या शासकीय गोदाममध्ये मंजूर नियतनाप्रमाणे पोहोच करण्यात येणार आहे. शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या परिमाणानुसार खालीलप्रमाणे तालुकानिहाय मे व जून 2020 या महिन्यांसाठी मे -2020 करिता तूरडाळ व जून 2020 करिता चनाडाळीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.
यानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी, एपीएल केसरी शेतकरी लाभार्थी आणि उर्वरित केसरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी परिमाण प्रत्येक महिन्यासाठी नियतन मंजूर करून पोहोचवण्यात येत आहे.
buy tadalafil generic – tadalafil liquid tadalafil 20