प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – तालुक्यातील आढळगाव येथील युवकाच्या गळा, छाती, दोन्हीही हाताच्या पंजावर आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणात धारदार हत्याराने वार करून जिवंत मारण्यात आले.

मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८ वर्षे) रा. आढळगाव, असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत मुकुंद याचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादेवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील शनिवारी (दि. २) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुकुंद जयसिंग वाकडे हा ट्रक्टरच्या सहाय्याने स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट नं . १३३ / १ मध्ये डाळिंबाचे पिकावरती फवारणी करण्याकरिता गेला होता. त्यानंतर शेतातील पाईपलाईनचा वाल फिरवण्यासाठी त्याच्या वडिलाने मोबाईलवरून त्याला तीन ते चार वेळा फोन केला. मात्र, मुकुंद याने फोन उचलला नाही. त्यानंतर सुमारे १०. १५ च्या सुमारास विजय लहानू वाकडे याने फोनकरून सांगितले की, मुकुंद यांच्या गळ्याला तार लागून जखमी झाला आहे.
ताबडतोब डाळींबच्या शेतात या असे सांगितल्यावर मुकुंद याच्या आई, वडील व भाऊ डाळींबच्या शेतात जाऊन पाहिले असता मुकुंद हा त्याच्याकडील ट्रॅक्टरजवळ पडलेल्या व त्याच्या गळ्यावर तसेच छाती, दोन्हीही हाताच्या पंजावर आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणावर जखम झालेली होती व तो मयत झालेला होता. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याचे शव श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते.
याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली. या घटनेची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनला समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून हा खुनाचा प्रकार असावा त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने शोधमोहीम सुरु केली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.