प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
आज 4 मे पासून संपूर्ण देशातील तिसरा लॉकडाऊन सुरू झाला आहे. मात्र, यावेळी अनेक व्यवहार सुरू करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सर्व प्रकारच्या छोटी दुकाने तसेच मद्याची दुकाने सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. मात्र, जिल्हाधिका-यांचे आदेश नसल्याने नगर शहरासह जिल्हाभरात संभ्रमावस्था निर्माण झाल्याने अद्यापही शहरातील व्यवहार बंदच आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा सुरू होती. परिणामी अनेक जण आज काय करायचे याचे आदेश नसल्याने संभ्रमावस्थेत आहे. परिणामी केंद्र व राज्य सरकारचे आदेश असतानाही आज अहमदनगर बंदच आहे.