प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड – कोरोना विषाणूचा (covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे बीड जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी, तसेच बीड जिल्ह्याबाहेर अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी आयटीआय कॉलेज नगर रोड, बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे, असा आदेश देण्यात आला होता त्यात काही सुधारणा करून आदेश जारी करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यांचे मूळ ठिकाणी जाण्यासाठी तसेच बीड जिल्ह्यातील बाहेर अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट www.beed.gov.in वर पास मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यांतर्गत हालचालींसाठी https://covid19.mhpolice.in या लिंक वर भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
यासाठी श्रीकांत निळे, तहसीलदार (महसूल) यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत असून लोंढे, पोलीस उपनिरीक्षक बीड यांच्याशी समन्वय साधून नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून काम करतील. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन कालावधीमध्ये इतर राज्यातील, केंद्रशासित प्रदेशामधील विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती असतील यांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील इतर राज्यात, केंद्रशासित प्रदेशात अडकलेल्या विस्थापित व्यक्तींना प्रवेश देण्यासाठी मुभा देऊन त्यासाठी कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे.
या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला, असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी बीड यांनी आवाहन केले आहे.
tinder login, tinder date https://tinderdatingsiteus.com/