प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड – माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या आदेशावरून व भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज बीड शहरातील कबाड गल्ली येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज १६०० जणांची तपासणी करण्यात आली. एकुण २६ दिवसात ७४,००० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काल रविवारी पेठ बीड विभागातील आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
यावेळी राजेंद्रजी म्हस्के, भगिरथजी बीयाणी, डॉ लक्ष्मण जाधव, विलास बामणे, सचीन उबाळे, दत्ता परळकर, अमोल वडतीले, संग्राम बांगर आदी टीम उपस्थित होती. आज कबाड गल्ली येथे नगरसेवक बाळासाहेब जाधव, सागर देशपांडे, संतोष जाधव, भैया भोसले आदी जणांना आरोग्य तपासणी करताना चांगल्या प्रकारे मदत केली.