पाचपुते यांच्या प्रयत्नानेच भीमा नदीपात्रात पाणीसाठा
पेडगावचे माजी सरपंच रोहिदास पवार यांची काही शेतक-यांसह पाहणी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – भिमानदीचा पाञात भर उन्हाळ्यात शेतीसाठी पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व शेतक-यांना कोरानांचे संकट असताना ही पाण्यामुळे त्यांचा चेहरावर वेगळच प्रकारचे समाधान दिसत आहे. परंतु काही दिवसापूर्वी काही वृत्तामध्ये भीमा नदीचे पाणी काही दिवसात संपेल, यामुळे शेतकरांचे पिकांचे, फल-बागांचे मोठे नुकसान होईल अशा चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. परंतु आज प्रत्यक्षात पेडगावचे माजी सरपंच रोहिदास पवार यांनी काही शेतक-यासह स्वत: पाहणी करुन त्यांनी सांगितले की या सर्व बातम्या खोट्या असून हे खोडसाळ पणाचे वृत आहे, माजी मंञी बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नाने जून अखेर पुरेल एवढा पाणीसाठा भीमा नदीपाञात आहे.
यावेळी उत्तमराव आधोरे, सुरेश क्षीरसागर, नानासाहेब शितोळे, विशाल कवडे, रोहित गायकवाड, जंजीरे सर, माणिक झिटे,इरफान फिरजादे,बस्सीरभाई काझी,दिलीप काराळे,सुनिल खेडकर,भगवान कणसे,बाळु नवले,शकुर शेख,विठ्ठल वाळुंज,गणेश मैंद,संजय आगिले,अंबादास नेटके,दत्ताञय अनुभुले,कुडलिंक रसाळ हे शेतकरी उपस्थित होते.