Ahmednagar Breaking news : Corona : जिल्ह्यात फक्त शिल्लक राहिले आठ कोरोना रुग्ण; नगरमधील आणखी सहा जणांची कोरोनावर मात

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यासाठी कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त आहे. जिल्ह्यातील आणखी सहा रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आता जिल्ह्यात फक्त आठ कोरोनाचे रुग्ण शिल्लक आहेत. जिल्ह्यातील जामखेड येथिल ७ रुग्ण तर पाथर्डी येथील १ रुग्ण असे एकूण ८ जण आता उपचार घेत आहेत.

नगर जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचे अंतिम रिपोर्ट निगेटीव आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. जामखेड येथील दोन तर संगमनेर येथील चौघांचा यामध्ये समावेश आहे. संगनेरमधील सर्वच्या सर्व रुग्ण आता बरे होऊन घरी गेले. तर जामखेडमधील ७ रुग्ण आता राहिले आहेत.

तसेच पाथर्डी येथील एक आणि जामखेड येथील सात असे आठच रुग्ण नगरमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण ४४ रुग्ण आ़ढळून आले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर ३४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here