Kada : अशमिरा सय्यद हिचा पहिला रोजा

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कडा – अशमिरा सय्यद या नऊ वर्षाच्या बालिकेने रमजानच्या पवित्र महिन्यातील आयुष्यातला पहिला रोजा तिने पूर्ण केल्याबद्दल तिचं कौतुक होत आहे. 
यावर्षी प्रथमच ऐन “मे” च्या अतिशय कडक उन्हाळ्यात मुस्लिम धर्मीयांतील पवित्र रमजान महिन्यातील रोजा सुरु झाले आहेत. कडा येथील अशमिरा अस्लम सय्यद इयत्ता चौथीत शिकणा-या विद्यार्थीनीने रमजानच्या पवित्र महिन्यातील प्रथम उपवास पूर्ण केला. पहाटे साडेचार वाजता सैहरी करून दिवसभर प्रखर उन्हाळ्यात अन्नपाणी न घेता चिमुकलीने थेट सायंकाळी कुटूंबीयांसोबत प्रार्थना करून रोजा पूर्ण केला. त्याबद्दल तिचे नातलगांकडून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here