प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
ढोरजळगांव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष देईल ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून जिल्ह्यात राष्ट्रवादीची जोपसना केली. जिल्ह्यातील तीन तालुक्यातील जनतेशी व विकास कामाच्या माध्यमातून पोहचलेले एक विश्वासू नेतृत्व, पक्ष वाढीसाठी व पडत्या काळात पक्षाला आधार देणारे माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर घुले व माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले या दोन्ही बंधूंपैकी एकाला विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी पक्ष श्रेष्ठीकडे केली आहे.
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली. जिल्ह्यात मारुतराव घुले पाटलांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊन आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पवार साहेबांचे विचार, पक्षाचे ध्येय धोरणे खेड्यापाड्यात, गावागावात, घराघरात पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे अविरत चालू केले व आजही ते काम घुले कुटुंबाकडून चालू आहे.
पक्ष स्थापनेपासून मतदारसंघात वरचष्मा ठेवत सर्व सत्ता काबीज केली. २०१३ नतंर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये प्रंचड मोडकळीस आला अशा वेळी पक्षाने मा.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर गेला पंरतू त्या नंतरच्या कठिण काळात चंद्रशेखर घुले यांनी जिल्हा पिंजून काढला संघटनेतील सर्व सहका-यांना धीर दिला. संघटना बांधली व त्या काळात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका जिल्ह्यात पक्षाच्या चिन्हावर लढून जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात सिंहांचा वाटा उचलला, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना शेवगाव तालुक्यातून चांगले मताधिक्य घुले बंधूंच्या नेतृत्त्वाखाली मिळाले.
चंद्रशेखर घुले जिल्हाध्यक्ष असताना तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जिल्ह्यात, तालुका तालूक्यात आंदोलन करुन रस्त्यावर उतरुन प्रश्न विचारुन जेरीस आणले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांनी घुले बंधूंची पक्षाची एकनिष्ठता, पक्ष बांधणी, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना दिलेल पाठबळ, मतदारसंघात इतर संस्थेत सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन दिलेली संधी या सर्व बाबींचा विचार करून पक्ष श्रेष्ठींनी २१ मे २०२० रोजी निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेत सदस्य म्हणून जिल्ह्यातील पक्षाचे एकनिष्ठ घुले बंधूंपैकी एकाला संधी द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.