उत्तर प्रदेशमधील 476 मजुरांना सोडविण्यासाठी हालचाली सुरू
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – तहसील कार्यालयाने जिल्हा बाहेरील व राज्या बाहेरील मजुरांना आपल्या घरी सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हिंगोली येथील 20 मजूरांना घेऊन पहिली बस आज दुपारी 3 वाजता श्रीगोंद्यातून रवाना झाली तर उत्तर प्रदेशमधील 476 मजुरांना सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मजुरांना सोडवण्यासाठी काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलने चार बसेसची व्यवस्था केली आहे, अशी माहिती
परिक्रमा संकुलचे सचीव विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली. तर भारतीय काँग्रेस पक्षाने परप्रांतीय मजुरांची रेल्वेची तिकिटे काढून व्यवस्था केली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली. श्रीगोंदा येथील चंद्रकांत चौधरी यांनी सर्व मजुरांसाठी बसमध्ये एक टाईम खाण्यासाठी भेळीची व्यवस्था केली आहे.
श्रीगोंद्यात बाहेरील राज्यातील 1 हजार 862 राज्या बाहेरील 5 हजार 012 मजूर आहेत सर्व मजुरांना रेल्वे आणि बस उपलब्धतेनुसार त्यांच्या जिल्ह्यात सोडविण्यात येईल. त्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत. मजुरांना गाडीत बसण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
– महेंद्र महाजन तहसीलदार श्रीगोंदा