Education : महत्वाची बातमी : सीबीएसई बोर्डाच्या 10 वी व 12 वीच्या परीक्षा 1 जुलैपासून

0
प्रातिनिधिक छायाचित्र

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या 10 वी व 12 वीच्या परीक्षा आता 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.

मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकाडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.

ट्विटवर एक व्हिडीओ ट्विट करून पोखरियाल यांनी ही माहिती दिली. सीबीएससी बोर्ड १० आणि १२ वीच्या उर्वरित परीक्षा घेणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे. आता या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here