Ahmednagar: जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ०७ रुग्ण वाढले

0

जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या आता ५१

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर: संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी ०२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ०७ रुग्ण आढळून आले.

आता आलेल्या अहवालानुसार बाधित व्यक्तीमध्ये २८ वर्षीय महिला आणि ०५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या 51 झाली आहे.
आता आढळून आलेल्या ०२ बाधित व्यक्ती या काल मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here