Ahmednagar : मसाले विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण करत चाकूच्या धाकाने लुटले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर  –  मसाले विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण करत चाकूच्या धाकाने लुटले. १ हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा ११ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सुरू असताना सोडवण्यासाठीमध्ये आलेल्या स्थानिकांना चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली व चोर पसार झाले.

ही घटना शहरातील आंबेडकर चौक ते माळीवाडा रोडवर आण्णाभाऊ साठे कमानीजवळ घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मसाले विक्रेते मयूर चंद्रकांत बोळे (रा. नागरदेवळे, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. फिर्यादी आण्णाभाऊ साठे कमानीजवळ येताच त्यांना दोघांनी अडविले. दोघा चोरांनी फिर्यादीस मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटले. सहाय्यक निरीक्षक हेमंत भंगाळे हे तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here