Maharashtra : Education : Hingoli : ज्यादा फी आकारणा-या खाजगी शाळांवर कारवाई करू – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नवीन शैक्षणिक वर्षात ज्या खाजगी शाळा ज्यादा फी आकारतील अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

त्या हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री असून आज हिंगोलीच्या दौ-यावर असताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी खाजगी शाळा प्रवेश शुल्काबाबत पालकांना दिलासादायक वक्तव्य केले.

नवीन शैक्षणिक वर्ष दरवर्षी 15 जूनला सुरू होते. याही वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष या तारखेलाच सुरू करण्याच मानस आहे. मात्र, कोरोना संकटामुळे अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईन. त्याच वेळी खाजगी शाळांकडून आकारण्यात येणा-या शुल्कवाढीबाबत त्या म्हणाल्या की कोरोनामुळे अनेक पालकांची परिस्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे शाळांनी कोणतीही शुल्कवाढ करू नये. तसेच शैक्षणिक फी टप्प्या-टप्प्याने भरण्यास पालकांना मुभा द्यावी. ज्यादा शुल्क आकारणा-या शाळांवर कारवाई करण्यात येईन असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, त्यांच्या निर्णयामुळे पालकवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here