Shrirampur : नगराध्यक्षा अनुराधा आदिकांचे दातृत्व; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 2,22,000 चा धनादेश

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांनी आपले नगराध्यक्षपदाचे सरकारकडून मिळणारे मानधन दोन लाख 22 हजार रुपये कोरोनाच्या संकटासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्याचे नगर विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आले. 

शहरातील प्रशासकीय इमारतीत तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, गट विकास अधिकारी जालिंदर आभाळे, मुख्याधिकारी समीर शेख आदी यावेळी उपस्थित होते.

नगराध्यक्षा आदिक यांनी डिसेंबर 2016 पासून ते मार्च 2020 पर्यंत चे मानधन न घेता एक सामाजिक बांधिलकी म्हणून दोन लाख 22 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तनपुरे यांनी अनुराधा आदिक यांच्या या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचा आदर्श इतर लोकांनीही घ्यावा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले. आपले मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणा-या आदिक या राज्यातील पहिल्याच नगराध्यक्षा आहेत, असेही तनपुरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here